ताज्या घडामोडी

लोणावळा येथे भैरव गर्जना ढोल ताशा पथकाने आज कै.स्वरा चांदेकर हिचे मारेक-यास फाशी द्या या मागणीसाठी मोर्चा काढला व तिव्र निषेध केला.

कँडल मार्च काढून निषेध ..! !

Spread the love

लोणावळा येथे भैरव गर्जना ढोल ताशा पथकाने आज कै.स्वरा चांदेकर हिचे मारेक-यास फाशी द्या या मागणीसाठी मोर्चा काढला व तिव्र निषेध केला.

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.७ (प्रतिनिधी ) गावठाण , लोणावळा येथे भैरव गर्जना ढोल ताशा पथकाचे कार्यकर्त्यांनी आज कोथुर्णेतील निष्पाप चिमुकल्या कै.स्वरा चांदेकर हिचे मारेक-यास फाशी द्यावी , या मागणीसाठी कँडल मार्च काढून तिव्र निषेध केला.
एक लढा स्वतःच्या लेकी साठी , नाही कोणत्या जातीसाठी! नाही कोणत्या धर्मासाठी ! ! हा लढा कोवळ्या कन्येसाठी ! ! नारी शक्तीसाठी ! ! माणुसकी विसरलेल्या नराधमास अद्दल शिकवण्यासाठी ! ! ! आसेच ब्रीद या भैरव गर्जना , ढोल ताशा पथकाने मनात विचार रूजवले आहेत.यातील सुमारे पन्नास टक्के कन्या आणि विवाहीत स्रिया या मंडळात ढोल वाजवत गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आल्या आहेत.

कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलगी कै.स्वरा जनार्दन चांदेकर हिचे अपहरण व हत्या प्रकरणातील नराधाम आरोपी हरामखोर तेजस दळवी याला शिक्षा व्हावी , या मागणीसाठी आज छत्रपती शिवजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. याबाबत मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांना पोस्टा द्वारे पत्र देऊन सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी व फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही भैरव गर्जना ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट लोणावळा म्हणून केली ,असा मजकूर पञात आहे.
सदरच्या पत्राची एक प्रत येथील लोणावळा शहर पोलिस स्टेशनला आज देण्यात आली.

आपण ही घटना तसेच महाराष्ट्रातील घडलेल्या अशा अनेक बलात्काराच्या घटनांना फास्टट्रैक मधे घालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.ही आम्ही एक सुशिक्षित नागरिक म्हणून मागणी करीत आहोत.
खरा मर्द तोच असतो, जो प्रत्येक स्त्री मधे माता जिजाऊ शोधतो!
स्त्री ही भोगवस्तु नाहीये ,ती अनंत काळची माता आहे, ही आपली संस्कृती आहे.
स्वरांजली चांदेकर फक्त सात वर्षाची होती , पण , सात , १७, २७,३७,४७,५७,६७ असो ! ! वय कितीही असो! अत्याचार तो अत्याचारच आणि त्याला उपाय फक्त मृत्युदंडच !!
आसे येथील उपस्थितीत असलेल्या वक्त्यांनी भावना मांडल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!