ताज्या घडामोडी

रूपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदावर असताना चाकणकर यांनी राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर केलेल्या आक्रमक शैलीतील आंदोलनामुळे त्या कायम राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिल्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.राज्यातील महिलांच्या हक्कासाठी आपण खंबीरपणे काम कराल हा तुमच्या आजवरच्या प्रवासावर विश्वास वाटतो .असे ट्विट दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!