ताज्या घडामोडी

एसटीचे पुणे विभागीय कार्यालय बनलय दारूचा अड्डा

Spread the love

पुणे : एसटी चे पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात हाय फाय ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एसटीचे आगार  दारूचा अड्डा बनले आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय. ह्या पार्ट्या येथील अधिकाऱ्यांच्या असल्याचे बोलले जात आहे.

एसटी कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी संपावर आहे.  आंदोलन कर्त्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे हा कर्मचारी आर्थिक विवंचनेत अडकला असताना दुसरीकडे एसटीच्या पुणे विभागीय कार्यालय परिसरात चक्क दारूच्या पार्ट्या सुरू आहेत .

या कार्यालयाच्या आवारात पडलेल्या दारूच्या बाटल्या महागड्या ब्रँडच्या आहेत. सामान्य कर्मचाऱ्यांना त्या पीणे परवडणारे नाही. एसटीच्या या कार्यालयात 24 तास ‘सुरम सुरक्षा’ची सेक्युरिटी तैनात  असते. त्यामुळे बाहेरुन बाटल्या आणून टाकणे शक्य नाही.मग या बाटल्या  कोणाच्या?हे सरकारी कार्यालय आहे की दारूचा अड्डा?असा सवाल उपस्थित होतोय. यासंदर्भात अधिकार्‍यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!