ताज्या घडामोडी

मोठी बातमी ! यापुढे बंद होणार सातबारा उतारा 

Spread the love

मुंबई : मोठ्या शहरात जमीन शिल्लक नसल्याने सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटीसर्वे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

सातबाराच प्रॉपर्टी कार्ड मध्ये रुपांतर झालेलं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो.त्यामुळे फसवणुकीचे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व शहरांमध्ये सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे. या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील हवेली तालुक्यासह सांगली-मिरज नाशिकमध्ये अंमलबजावणी करण्यात येईल हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यभरात राबवण्यात येईल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!