ताज्या घडामोडी

मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकार्यांचा घेतला निरोप.

आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे,आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले. यशोमती ठाकूर.

Spread the love

आज मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकार्यांचा निरोप घेतला

आवाज न्यूज: मुंबई प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याची महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री तथा अमरावती पालकमंत्री म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळल्यानंतर आज मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकार्यांचा निरोप घेतला यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. स्वतः औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खाजगी सचिव, विशेष अधिकारी, पोलिस स्टाफ यांचे पासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक यांचा सत्कार केला.

आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे.  आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली, असे यशोमती ठाकुर म्हणाल्या. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे असणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन असे आश्वासन दिले. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!