इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्डच्या वतीने खंडाळा येथे वन्यजीव सप्ताह साजरा
खंडाळा: येथील माजी विद्यार्थी संघ खंडाळा व इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्डच्या वतीने वन्यजीव सप्ताह संतगाडगे महाराज प्रा. शाळा. खंडाळा शा. क्र.10 व प्रा. रा. मोरे. लो. न. प. माध्य. खंडाळा येथे साजरा करण्यात आला.
वनपरीक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी मुलांना वन्यजीव विषयावर मार्गदर्शन केले. मुलांशी सागर चुटके यांनी संवाद साधत चर्चा केली.कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेचे महत्व कायम राखा हे मुलांना पटवून दिले.तसेच वन्यजीवांपासून आपले संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
.यावेळी मुख्याध्यापक दिवेकर, मुख्याधपिका म्हाळसकर, सय्यद, सुचेता एखे, आगलावे, भुरे, सुनीता गावडे, आठरे, भाले, सूर्यवंशी, बोरसे, अमृता पठारे, अरुण इंगोले, डेबूजी झिग्रजी जानोटकर माजी विद्यार्थी संघ खंडाळाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, राजेश महाडिक, मंगेश येवले, अशोक गवारणे, राजेंद्र ढाकोल, इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड चेअध्यक्ष अशोक घाडगे,सुनिल शिंदे, रत्नप्रभा गायकवाड, पत्रकार श्रावणी कामत, आशिष जंlगीर, राठोड मॅडम, आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते



