ताज्या घडामोडी

सचिन घोटकुले यांनी केला स्वखर्चातून रस्ता

12 किलोमीटर अंतर झाले कमी

Spread the love

महागाव : सचिन घोटकुले यांनी महागाव मधील मालेवाडी ते लोहगड या रस्त्याचे काम स्वखर्चातून केले आहे. मुरूम व माती टाकून जेसीबीच्या साह्याने जवळपास दीड ते दोन पावणेदोन किलोमीटर रस्ता  त्यांनी स्वखर्चाने केला.

महागाव व आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांना पवनानगर मार्गे वळसा घालून लोणावळा पर्यंतचा प्रवास करावा लागत होता. परंतु घोटकुले यांनी पुढाकार घेऊन रस्ता तयार केल्याने पूर्वीपेक्षा 12 किलोमीटर अंतर कमी झाले आहे.

सचिन घोटकुले यांच्या औदर्याबद्दल महागाव ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. वेळेची बचत झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!