ताज्या घडामोडी

शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग! भारतातील ‘या’शेतकऱ्याने यशस्वी केली कलरफुल मक्याची लागवड, घराच्या छतावर यशस्वी केला प्रयोग..

Spread the love

शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग! भारतातील ‘या’शेतकऱ्याने यशस्वी केली कलरफुल मक्याची लागवड, घराच्या छतावर यशस्वी केला प्रयोग..

आवाज न्यूज : महाराष्ट्र, ३० नोव्हेंबर.

कृषी क्षेत्र हे एक प्रयोगशाळा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नवीन पिकांचे प्रयोग तसेच तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या खूप मोठे प्राधान्य असून तेवढा वाव देखील आहे. आता बरेच शेतकरी बंधू शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करतात. शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड, तसेच अगदी हवामानाच्या विरोधात जाऊन केलेली एखाद्या पिकाची किंवा फळबागाची लागवड देखील शेतकरी यशस्वी करून दाखवत आहे.

आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये सफरचंदाची लागवड देखील यशस्वी केली जात असून ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन देखील आता महाराष्ट्र तसेच एकंदरीत भारतात मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे. आता याबाबतीत जर आपण कोबीचा विचार केला तर अनेक ठिकाणी शेतकरी रंगीत कोबीची शेती यशस्वी करत आहेत.

अगदी त्याच पार्श्वभूमीवर केरळ राज्यातील एका शेतकऱ्याने चक्क शेतामध्ये रंगीत मक्याचे पीक यशस्वीपणे घेऊन दाखवले असून या शेतकऱ्यांचे नाव आहे अब्दुल रशीद हे होय. ते मल्लापुरम या ठिकाणी राहतात. विशेष म्हणजे त्यांनी रंगीत मक्याची शेती ही घराच्या टेरेसवर यशस्वी केली असून हे मका इंद्रधनुष्य रंगांमध्ये खूपच आकर्षक अशी दिसते.

कलरफुल मक्याच्या कणसाला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्यामुळे रशीद यांनी त्यांच्या घराच्या टेरेस अर्थात छतावरच या इंद्रधनुष्य म्हणजेच रेनबो कॉर्नची शेती केली आहे. यामध्ये योग्य प्रकारे काळजी व व्यवस्थापनाने त्यांनी चांगल्या पद्धतीची मक्याचे उत्पादन देखील घेतले आहे. जर आपण एकंदरीत कलरफुल मक्याचा विचार केला तर सामान्य मक्यासारखेच या मक्याचे देखील चव असते व इतर मक्याप्रमाणेच वेगवेगळ्या रेसिपी या मक्यापासून बनवता येऊ शकतात.

अब्दुल रशिद यांनी पिकवलेली कलर फुल मका ही तांबड्या, पांढऱ्या, पिवळ्या, हिरवा, आणि जांभळा अशा रंगाचे दाणे असलेले असून सगळ्यांनाच या मक्याचे आकर्षण आहे. जर आपण रेनबो कॉर्न या पिकाचा विचार केला तर या मक्याचे पीक सगळ्यात अगोदर थायलंड या देशात घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!