मन्मथस्वामींचा रथोत्सव व पालखी सोहळा संपन्न मन्मथेश्वर मंदिर येथे श्रावणमास समाप्ती…..!

सोलापुर : भुसार गल्ली येथील संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदीरात श्रावणमास निमित्त अखंड शिवनाम व श्रावणमास समाप्तीचा समारंभ मन्मथस्वामींच्या रथोत्सवाने व पालखी सोहळ्याने संपन्न आला.
प्रारंभी मन्मथेश्वर देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त महादेवप्पा चाकोते व सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र गंभिरे, सचिव ॲड. धानय्या चिवरी तसेच देवस्थानचे विश्वस्त विश्वनाथ बुरकुले, आनंद चिडगुंपी, ॲड. रेवणसिध्द कोनापुरे आदी उपस्थित होते.
श्रावणमास समाप्ती निमित्त विविध फुलांनी सजवलेल्या मन्मथस्वामींच्या रथाची मिरवणूक ही मंगळवार पेठ, कुंभारवेस, क्रांती चौक, मधला मारूती, टिळक चौक या मार्गावरून निघाली. सोहळ्याच्या प्रारंभी सनई, चौघडे, बॅण्ड पथक, हालग्या व शोभेच्या दारूची आतीशबाजी करण्यात आली. श्री मन्मथेश्वर भजनी मंडळाने होटगी मठ, मल्लिकार्जून मंदीर व अव्ववरू मठ येथे आपली भजन सेवा रूजू केली.
या भक्तिमय कार्यासाठी
श्री मन्मथेश्वर देवस्थान व हनुमान देवस्थान ट्रस्ट भजनी मंडळ सदस्य सिद्धाराम वाडी, वेदमूर्ती प्रभूलिंग स्वामी, अप्पाराव तुगांवकर, मल्लिकार्जून जेउरे, बाळासाहेब गवळी, उमेश जिनकेरी, दत्तात्रय गवळी, आनंद साखरे, सुनिल शरणार्थी, संतोष शिलवंत, मनोज खंड़रे, गणेश खंड़रे, मयुर खंड़रे, राजु तुगांवकर, प्रकाश तुगांवकर, मल्लिकार्जून स्वड्डे, मन्मथ तुगांवकर, ॲड. राजशेखर धरणे, विजयकुमार बिराजदार, सोमा शरणार्थी, राजशेखर स्वामी, मंगेश हिरेमठ स्वामी, राजकुमार हिरेमठ, बसवराज येणेगुरे, सुरेश तुगांवकर, अथर्व बुरकुले, आदित्य खंड़रे, वरद तंबाके, सार्थक माशाळकर, मल्लेश पुरवंत, वीरशैव व्हिजनचे राजशेखर बुरकुलेआदी उपस्थित होते.
फोटो ओळी : मन्मथस्वामींचा रथोत्सव व पालखी सोहळा प्रसंगी महादेवप्पा चाकोते, प्रकाश वाले, नरेंद्र गंभिरे, ॲड. धानय्या चिवरी, विश्वनाथ बुरकुले, आनंद चिडगुंपी, ॲड. रेवणसिध्द कोनापुरे व इतर भक्त मंडळी



