ताज्या घडामोडी

उद्या पवनानगर येथे लाठी – काठी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ व महिला मेळावा

Spread the love

पवनानगर : मावळ तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व विठूमाऊली सोशल फाउंडेशन मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लाठी – काठी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ उद्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

उद्या रविवार (10 ऑक्टोबर) रोजी दुपारी 2 वाजता पवनानगर येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयात समारंभ पार पडेल. त्या अंतर्गत सुवर्णपदक विजेती तृप्ती निंबळे हिचा गुणगौरव व सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ ,माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सदस्य भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सर्व महिला भगिनी महीला पदाधिकारी ,विठू माऊली फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!