ताज्या घडामोडी

एनसीईआर महाविद्यालय आणि आर्या इंडस्ट्री मध्ये झाला सामंजस्य करार.

Spread the love

एनसीईआर महाविद्यालय आणि आर्या इंडस्ट्री मध्ये झाला सामंजस्य करार.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाचा आर्या इंडस्ट्री आणि दिपेश प्रेसिंग इंडस्ट्री यांच्या समवेत नुकताच सामंजस्य करार झाला. या करारा प्रसंगी आर्या इंडस्ट्री आणि दिपेश प्रेसींग इंडस्ट्रीचे डायरेक्टर दीपक फल्ले, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, विश्वस्त महेशभाई शहा, सोनबा गोपाळे, एनसीईआर च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रेमकुमार कोल्हे, करार समन्वयक प्रा. दमयंती इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘या करारद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या आस्थापनांमध्ये जाऊन इंटर्नशिप, इंडस्ट्रियल भेटी, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन फल्ले यांनी बोलताना दिले. संस्थेचे सचिव खांडगे यांनी अभियांत्रिकी व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या साठी राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. दमयंती इंगळे यांनी तसेच प्रथम वर्ष शिक्षक वर्ग यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!