सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी स्वखर्चातून पूर्ण केला मिंडेवाडीतील रस्ता

मिंडेवाडी : येथील बाळा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यामध्ये खूप दुरावस्था झाले होती. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते . तेथील स्थानिकांनी सरपंच दत्ता पडवळ यांच्याकडे तेथील रस्ता करून देण्याची मागणी केली.पडवळ यांनी लगेचच स्वखर्चातून तेथील रस्त्याचे काम पूर्ण करून दिले
ह्या कामाचे भूमिपूजन तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेशजी धोत्रे,सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, जनसेवक आदर्श सरपंच दत्ता पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर अध्यक्ष अविनाश बधाले, युवा नेते शाम पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतामध्ये फक्त निवडणुका आल्या की अनेक कार्यकर्ते इच्छुक होतात परंतु सरपंच दत्तांना पडवळ हे पाचही वर्ष कायम समाजामध्ये धडपडत असतात आणि समाजाची कामे करत असतात. मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत असतो परंतु असा सरपंच मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहिला नाही.येत्या काळामध्ये निश्चितच आंदर मावळातील जनता तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गुलाब बधाले,रोहिदास बधाले, राजू बधाले, देविदास बधाले, सोमनाथ बधाले, अनिल बधाले, अमित बधाले हे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बधाले यांनी केले. आभार युवानेते प्रेम बधाले यांनी मानले.





