आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी कट्टा (पिस्टल) कंबरेला लावून भाईगिरी; अंबाजोगाईत एक जेरबंद

अंबाजोगाई ( भरारी न्युज ) प्रतिनिधी.. अंबाजोगाई - शहरात कंबरेला गावठी कट्टा लावून खुलेआम फिरणाऱ्या एकास बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. शुक्रवारी (दि.२७) दुपारी ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्याविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरिक्षक उस्मान शेख यांच्या पथकाचे जिल्हाभर छापे सुरू आहेत. या पथकातील पोलीस हवालदार मारुती कांबळे यांना अंबाजोगाईत एक तरुण बेकायदेशीररित्या गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने यशवंतराव चव्हाण चौकात सापळा रचून अमित उर्फ सोन्या सुंदर गायकवाड (रा. सदर बाजार, अंबाजोगाई) यास कंबरेला लावलेल्या पिस्टलसह रंगेहाथ पकडले. यावेळी त्याच्याकडून पिस्टल, चार जिवंत काडतुसे असा अंदाजे ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरिक्षक उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली ग्रेपोउपनि हनुमान खेडकर, पोह/मारुती कांबळे, राजु पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड व चालक गणेश मराडे यांनी केली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!