*श्री अन्न उत्कृष्टता अभियान केंद्र बारामतीला हलवण्यासाठी भाजपाच जबाबदार – काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी*

सोलापूर, :- संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून उप मुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये “महाराष्ट्र श्री अन्न अभियाना”ची घोषणा केली. या अभियानासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद करून सोलापूर येथे “श्री अन्न उत्कृष्टता केंद्र” स्थापन करण्याची तरतूद शासनाने केली होती. मात्र सत्तेत अजित पवार गट सामील झाला आणि आता या उत्कृष्टता केंद्राचे ठिकाण सोलापूर मधुन थेट बारामतीला हलवण्याचा निर्णय झाला आहे. याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचे आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस यांनी सदर केंद्र सोलापूर साठी जाहीर केले होते परंतु भाजपाच्या नेत्यांना हे केंद्र इथे टिकवण्यात सपशेल अपयश आले आहे त्यामुळे सदर केंद्र इथून जाण्यास सर्वस्वी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप देखील प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे
या अभियानात श्री अन्न अर्थात ज्वारी, बाजरी, नाचणी अशा भरडधान्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार होते सोलापूर जिल्ह्याच्या वातावरणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी सदर केंद्र हे वरदान ठरणार होते यामध्ये
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, पिक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मुल्यसाखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी यांचा अभियानात अंतर्भाव आहे.
एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्याकरीता हे केंद्र होते 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी शासन खर्च करणार होता परंतु सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याची सर्वस्वी जबाबदार जनता पार्टीची आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.



