पेन्शन वाढीच्या आंदोलनासाठी चलो दिल्ली…..! चलो दिल्ली….!! चलो दिल्ली…..!!! अभी नही…… तो कभी नही….गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रामलीला मैदान नवी दिल्ली……!

पुणे:- मा.कमांडर श्रीयुत अशोक राऊत ,राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संघर्ष समिती यांनी गुरुवार दिनांक 7/12/2023 रोजी सकाळी 10 वाजता रामलीला मैदान ,नवी दिल्ली येथे पेन्शन वाढीच्या आंदोलनासाठी हजर राहण्याचे आव्हान सर्व सेवानिवृत्त पेन्शन धारकांना केलेले आहे. देशामध्ये ७२ लाखापेक्षा जास्त व महाराष्ट्रामध्ये 12 लाखापेक्षा जास्त सेवानिवृत्त पेन्शनधारक आहेत. गेल्या आठ वर्षा पासून पेन्शन वाढीसाठी अनेक प्रकारची आंदोलने झालेली आहेत. कमीत कमी रुपये 7500 पेन्शन वाढ, अधिक महागाई भत्ता व मोफत मेडिकल सुविधा ही सेवानिवृत्त पेन्शन धारकांची प्रमुख मागणी असून मोदी यांचे बरोबर कंमाडर राऊत याबाबत चर्चा देखील झालेली आहे. मोदी *आपका काम हो जायेगा….* असे म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाशी पेन्शन वाढीबाबत चर्चा करून त्यांना दिनांक 04 मार्च 2020 व 05 ऑगस्ट 2021 रोजी दोनदा पेन्शन वाढीबाबत आश्वासन दिले आहे. यावर त्यांनी 31 खासदारांची समिती नेमून त्या समिती बरोबर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्या समितीने पेन्शन वाढीबाबतचा अहवाल प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्री यांना सादर केलेला आहे. काही खासदारांनी संसदेत पेन्शन वाढीचा प्रश्न प्रभावीपणे मांडून आज पर्यंत 250 पेक्षा जास्त खासदारांनी पेन्शन वाढी समर्थनार्थ त्यांच्या सहीचे पत्र मोदी दिलेले आहे. परंतु अध्याप सेवानिवृत्तांचे पेन्शन वाढीचे काम झालेले नाही.

आता आपली लढाई अंतिम टप्प्यात आली असून आपल्याला कंमाडर राऊत यांच्या आदेशानुसार त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावयाचे आहे. चला तर मग गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन कमांडर राऊत यांचे हात बळकट करूया. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांना साथ देणे हे आपले कर्तव्य आहे. आंदोलन करण्यासाठी हजार पाचशे लोकांनी काही होणार नाही लाखोंच्या संख्येने पेन्शनर्स बंधू जमले तरच सरकारवर दबाव येईल. कारण आता लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असल्याने व त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांना आपले काम करावेच लागेल. त्यामुळे आता विचार करत बसू नका. आजच आपले दिल्लीला जाण्यासाठी 5 डिसेंबरचे 2023 चे रेल्वे तिकीट बुक करा व लाखोंच्या संख्येने सामील व्हा. ही सर्व पेन्शनर्स बंधू भगिनींना विनंती.
*पेंशन आमच्या हक्काची…… नाही कुणाच्या बापाची..,..*
*अरे कोण म्हणत देत नाही….. घेतल्या शिवाय राहत नाही…..*
*ज्येष्ठ नागरिक…… श्रेष्ठ नागरिक…..*
*जो ईपीएस ९५ पेन्शोनरोंका का काम करेगा….. वही देश पर राज करेगा…..*

*प्रकाश ज्ञानदेव शिंदे*
अध्यक्ष
ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती इंदापूर तालुका,
मु.पो.सणसर,ता.इंदापूर,जि.पुणे
मो.नं.9657220101



