ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व शाळांमध्ये गस्त..

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार रोडरोमीयोंना चाप..

Spread the love

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व शाळांमध्ये गस्त..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे २२ जुुुलै

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस महिला वर्ग तसेच विद्यार्थिनींना रोडरोमीयोंकडून विनाकारण त्रास होऊन काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने आज सर्व शाळांना भेट देऊन विद्यार्थीनी व शिक्षकांना समुपदेश व मार्गदर्शन करून शाळेच्या परिसरात विनाकारण भटकणाऱ्या तरुणांवर वचक बसावा यासाठी गस्त घालण्यात येत आहे.

नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन लांडगे, एपीआय पाटील , एपीआय साळी ,एपीआय पठारे , एपीआय मतकर ,पी एस आय धापटे मॅडम ,पी एसआय केकान पी एस आय शिंपणे , पोलीस नाईक प्रशांत वाबळे व बाबाराजे मुंडे ,पोलीस हवालदार बगाड , पोलीस नाईक भोईर ,पोलीस नाईक सोनवणे ,पोलीस नाईक रावते यांनी प्रत्येक शाळांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व विनाकारण भटकणाऱ्या वाहनचालकांना योग्य समज दिलेली आहे.

आज सकाळी इंद्रायणी महाविद्यालय , रामभाऊ परुळेकर शाळा , सरस्वती शाळा , नूतन परांजपे विद्यालय ,आदर्श विद्या मंदिर शाळा ,इंद्रायणी इंग्लिश स्कूल तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्व शाळा या ठिकाणच्या गेटवर प्रत्यक्ष पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित राहून येथील पालकांशी व विद्यार्थी वर्गाशी संवाद साधत बारकाईने गस्त घालताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!