ताज्या घडामोडी

तळेगाव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

Spread the love

तळेगाव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी″
तळेगाव दाभाडे:इस्लामने जगाला समता ,एकता, मानवता आणि शांततेचा संदेश दिला. सर्व मानवजातीला बंधुभाव आणि सामाजिक एकोप्यासाठी अल्लाहने आशीर्वाद द्यावेत, अशी
सामुदायिक प्रार्थना करीत तळेगाव परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साही वातावरणात आज साजरी केली.
ईदची नमाज मंगळवारी (दि.३) सकाळी
ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली.मौलाना सिकंदर ए आझम
यांनी नमाज पठण केले. त्यानंतर
त्यांनी ईद – उल- फित्रचे
महत्व सांगितले.
यावेळी तळेगाव आणि परिसरातील अनेक मुस्लिम बांधवांनी
ईदची नमाज अदा केली.
एकमेकांना आलिंगन देऊन
शुभेच्छा दिल्या.

रोजे धरलेल्या मुलांचे विशेष कौतुक मित्र – आप्तेष्टांनी केले.
यावेळी जामा मशिदचे विश्वस्त
समीर नालबंद, व्यवस्थापक रशिद सिकीलकर,
जामा मशिदचे प्रमुख
गनिमिया सिकीलकर, बाबुलाल नालबंद, गफूरभाई मुलाणी,
अस्लम सिकिलकर, मोबीन सिकीलकर,
समीर मणियार, रुस्तुम नालबंद, राजू सिकीलकर, अजिज सिकीलकर
यांच्यासह मुस्लिम बांधव
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांततेचा सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त नमाज पठणानंतर उपस्थित हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी
ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून
मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.ईदनिमित्त तळेगाव स्टेशन,
नवलाख उंबरे , उर्से, चांदखेड,
गहुंजे परिसरातही ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

_________________________

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!