ताज्या घडामोडी

रुपाली पाटील ठोंबरे यांचा मनसेला रामराम ; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश ?

Spread the love

पुणे : मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वीच पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा व प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची भेट घेतली आहे.  जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!