ताज्या घडामोडी

सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर करणार लवकरच राजकारणात एंट्री

Spread the love

मुंबई : आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवणार्‍या प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर लवकरच राजकारणात एंट्री घेणार आहेत.

पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना वर्षा उसगावकर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबर पासून गोव्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यावेळेस वर्षा उसगावकर पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

 

वर्षा उसगावकर यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मोठे नेते होते. त्यामुळे वर्षा उसगावकर यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळालेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!