ताज्या घडामोडी

तळेगावात स्वराज्यध्वज यात्रेचे स्वागत करत ध्वजाचे पूजन

Spread the love

तळेगाव : येथे स्वराज्य ध्वज यात्रेचे तळेगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करून पूजन करण्यात आले. स्वराज्य ध्वज हा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर हा ध्वज दसऱ्याच्या मुहूर्तावर उभारण्यात येणार आहे.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला हा भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज अर्थात स्वराज्य ध्वज सध्या 37 दिवसांच्या प्रवासात 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर प्रवास करत आहे.  विविध धार्मिक व अध्यात्मिक स्थळे, स्मारके अशी ऊर्जा केंद्रे असलेल्या 74 ठिकाणी ध्वजाचे पूजन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!